#

Products Detail

मॅक्झिलोह

सर्व पिकांसाठी उपयुक्त

घटक – चिलेटेड लोह 12% व/व.

1. जमिनीचा सामू 7.4 पेक्षा जास्त असणे, चुनखडीयुक्त जमीन असणे, शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यात कार्बोनेट आणि बाय कार्बोनेटचे प्रमाण जास्त असणे, जमिनीत सेंद्रिय कर्ब कमी असणे, जमिनीची निचरा क्षमता कमी असणे, जमिनीत मुळांची वाढ कमी असणे इ. आणि अशा परिस्थितीत पिकांमध्ये लोह कमतरता निर्माण होते.

2. जादा स्फुरदयुक्त खतांची मात्रा, वनस्पतीमधील जास्त कॅल्शियम, मॅग्नेशियम, पालाश यामुळे लोह कमतरता पिकात निर्माण होते.

3. अशा परिस्थितीत पानांवाटे फवारून आणि जमिनीतून चिलेटेड लोह देणे गरजेचे असते.

4. चुनखडीयुक्त अल्कली जमिनीत वाढणाऱ्या वनस्पतीची टोकाकडील पाने पिवळी पडतात. यामध्ये शिरा फक्त हिरव्या असतात, यालाच केवडा असे म्हणतात. याच्या प्रभावी नियंत्रणास मॅक्झिलोहचा उपयोग होतो.

5. मॅक्झिलोहच्या वापरामुळे वनस्पतीची पाने हिरवी होतात, परिणामत: प्रकाशसंश्लेषण वाढून अन्न तयार करण्याची क्षमता वाढते.

6. आवश्यक विकरांची निर्मिती होऊन प्रथिनसंश्लेषण वाढते.

मात्रा :

1) ठिबकने देण्यासाठी - 500 ग्रॅम ते 1 किलो प्रति एकर.

2) फवारून देण्यासाठी – 1 ते 2 ग्रॅम प्रति लिटर.


#

आमच्या सर्व उत्पादनाविषयी अधिक माहितीसाठी ...

Get answers and advice from people you want it from.