#

Services


पाणी परीक्षण

पाणी परीक्षण का करावयाचे ?


  • सजीवांचे आरोग्य हे सर्वस्वी शुद्ध पाण्यावर अवलंबून आहे, जसे सर्वसामान्य माणसाला शुध्द पाण्याची गरज असते तसेच वनस्पतींचे आरोग्य आणि त्यांची वाढ सुद्धा शुद्ध पाण्याशी निगडीत असते.
  • जास्त क्षारयुक्त पाणी सिंचनाद्वारे सतत दिले गेल्याने नको असलेले क्षार जमिनीत साठत जातात आणि त्याचा परिणाम वनस्पतींच्या वाढीवर आणि आरोग्यावर होतो, मुळांद्वारे असे पाणी शोषले
          जात नाही तसेच जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्ये स्थिर होण्यास सुरुवात होते आणि वनस्पतीमधील अन्नद्रव्यांचा समतोल बिघडतो.
  • असे पाणी फवारणीसाठी वापरल्यास औषधांची कार्यक्षमता घटते आणि म्हणावे तसे परिणाम आपल्याला दिसून येत नाहीत यामध्ये आपला वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो याचा थेट परिणाम
          पिकांच्या गुणवत्ता, उत्पादकता आणि टिकवणक्षमतेवर होतो.
  • सिंचनासाठी आणि फवारणीसाठी वापरण्यात येत असलेले पाणी योग्य आहे का? योग्य नसल्यास काय उपाययोजना कराव्यात यासाठी वर्षातून दोन वेळा योग्यवेळी पाणी परीक्षण करणे गरजेचे आहे.

  • पाणी नमुना घेण्याची पद्धत :-


  • पाणी परीक्षण कमीत कमी वर्षातून २ वेळा करणे गरजेचे आहे. अनुक्रमे उन्हाळ्यात आणि पावसाला झाल्यानंतर.
  • पाणी नमुना घेत असताना स्वच्छ प्लास्टिकच्या बाटलीमध्ये पूर्ण तोंडापर्यंत भरून घ्यावा, बाटलीमध्ये हवा ठेऊ नये.
  • बोअरवेल, विहीर, शेततळे यामधील पंप ५ मिनिटे सुरु ठेऊन पाईपनमधील सर्व पाणी जाऊ द्यावे आणि त्यानंतर बाटलीमध्ये नमुना घ्यावा.
  • ड्रिपमधील, पाईपलाईन पाण्याचा नमुना घेऊ नये.
  • एकाच क्षेत्रामध्ये एकापेक्षा अधिक पाण्याचे स्त्रोत असतील तर त्यामधील नमुने वेगवेगळे गोळा करावेत.
  • नमुना बाटलीमध्ये गोळा केल्यानंतर बाटलीवर उल्लेख असणे गरजेचे आहे.
  • शेतकऱ्याचे नाव
  •       -> पाण्याचा स्त्रोत

          -> पत्ता

          -> मोबाईल नंबर

  • पाण्याचा नमुना प्रयोगशाळेत मिळाल्यानंतर रिपोर्ट मिळण्यास कमीत कमी ५ दिवसांचा कालावधी लागतो.
  • #

    आमच्या सर्व उत्पादनाविषयी अधिक माहितीसाठी ...

    Get answers and advice from people you want it from.