#

Services


माती परीक्षण

माती परीक्षण का करावयाचे ?


  • सर्व सामान्य कुटुंबातील माणूस जसे आपले उत्पन्न आणि बँकेमधील शिल्लक रक्कम पाहून पुढीलखर्चाबाबत व्यवस्थापन करतो त्याच पद्धतीने पैसा देणाऱ्या पिकांसाठी (कॅश क्रॉप) जमिनीमध्ये
          अन्नद्रव्यांचा शिल्लक उपलब्ध साठा किती आहे हे पाहून पुढील खतांचे (अन्नद्रव्यांचे) व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
  • अशा पिकामध्ये (डाळिंब, द्राक्ष, पपई, आंबा, पेरू, चिकू, केळी, भाजीपाला, फळभाजी इ.) वर्षातून कमीत कमी एकदा योग्यवेळी माती परीक्षण करणे गरजेचे आहे.
  • बऱ्याचदा जमिनीमध्ये उपलब्ध अन्नद्रव्ये असूनसुद्धा ती पिकांकडून घेतली जात नाहीत त्यामुळे अतिरिक्त खते शेतकऱ्यांकडून जमिनीत दिली जातात आणि त्यामुळे जमिनीचा समतोल बिघडतो,
          रोग-कीड यांचा उपद्रव वाढतो, उत्पादकता आणि गुणवत्ता घटते तसेच शेतीमधील उत्पादन खर्च वाढतो याची कारणे माती परीक्षण अहवालामध्ये दिसून येतात आणि त्यावरून आपल्याला पुढील
          व्यवस्थापन करणे खूप सोपे जाते.
  • पिकाच्या विविध अवस्थेमध्ये अन्नद्रव्याची गरज भिन्न असते. त्यानुसार आवश्यक अन्नद्रव्ये पिकाला उपलब्ध होणार किवा नाही याची निश्चित आणि अचूक माहिती उपलब्ध होण्यासाठी माती व पानदेठ
         पृथ:क्करण या आवश्यक गोष्टी आहेत.
  • मिळालेल्या अहवालानुसार आपण पुढे अचूक खत व्यवस्थापन करून पिकांची उत्पादकता व गुणवत्ता यामध्ये सातत्य राखू शकतो.
  • द्राक्षाचा विचार केल्यास फुलोरा अवस्था व मऊ पडण्याच्या अगोदरची या दोन अवस्था द्राक्षाची उत्पादकता व गुणवत्ता या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अवस्था आहेत म्हणून या अवस्थामधील पृथ:क्करण
          अहवाल अत्यंत महत्वाचे आहेत.

  • मातीचा नमुना घेण्याची पद्धत :-


  • पिक काढल्यानंतर किवा लागण करण्याआधी मातीचा नमुना घेणे आवश्यक आहे.
  • मातीचा नमुना घेण्यासाठी एक एकर क्षेत्रासाठी एक नमुना असावा.
  • प्लॉटच्या सर्व बाजूनी २ ते ३ मीटर जागा सोडून द्यावी.
  • रासायनिक खते टाकली असल्यास मातीचा नमुना घेऊ नये.
  • जनावरे बसण्याची, बांधण्याची जागा, सांडपाण्याचा चर, काडी-कचरा, खत टाकण्याची जागा, जमिनीची धूप होणारी जागा याजवळचा नमुना घेऊ नये.
  • किमान वर्षातून एकदा माती परीक्षण करून घ्यावे
  • नमुना काढण्यास घेतलेली खोरे, खुरपे, कुदळ अशी अवजारे तांबरलेले नसावेत.
  • ड्रीपपासून पाटामध्ये सर्वसाधारण ३.५ फुट अंतरावर (V) आकाराचा निमुळता १.२५ ते १.५ फुट खोल खड्डा काढावा.
  • त्याखड्ड्यातील सर्व माती बाहेर काढून टाकावी.
  • खड्ड्याच्या वर पासून तळापर्यंत १ किलो माती तासून गोळा करावी
  • असे एकरी ८-१० ठिकाणी मातीचे नमुने घ्यावेत.
  • अशाप्रकारे गोळा केलेली सर्व माती एकत्र मिसळून घ्यावी.
  • एकत्र मिसळून अर्धा वाटा अर्धा वाटा करून समोरासमोरील माती बाजूला करावी.
  • अशाप्रकारे एकत्र मिसळून अर्धा किलो मातीचा नमुना गोळा करावा.
  • त्यामधील काडीकचरा बाजूला करून. सावलीमध्ये पसरून वाळवावी.
  • गोळा केलेल्या मातीचा नमुना चाळू नये किवा घोळू नये.
  • स्वच्छ कापडी पिशवीमध्ये भरून त्यावर खालील उल्लेख असणे गरजेचे आहे
  • शेतकऱ्याचे नाव
  •       -> सध्या असलेले पिक

          -> मोबाईल नंबर

          -> प्लॉट नंबर

          -> पिकामधील माहिती

          -> मुख्य समस्या

  • अशाप्रकारे गोळा केलेला मातीचा नमुना प्रयोगशाळेत परीक्षणासाठी पाठवावा.
  • मातीचा नमुना प्रयोगशाळेत मिळाल्यानंतर रिपोर्ट मिळण्यास कमीत कमी ७ दिवसांचा कालावधी लागतो.
  • अ.क्र. पिक नमुना कधी घ्यावा ?
    1. ऊस, आले, हळद, कांदा, लसून, मिरची, वांगी, भेंडी, कलिंगड, टरबूज, खरबूज, पडवळ, दोडका, कारली, काकडी, टोमाटो, फ्लॉवर, कोबी, गवार,
    मुळा, गाजर, सोयाबीन, भुईमुग, सर्व प्रकारच्या बिया, डाळी, बटाटा, रताळे, पालक, कोथिंबीर, मेथी, केळी, कापूस, पपई, काजू
    लागण करण्याआधी 25-30 दिवस
    2. सर्व प्रकारची फुले लागण करण्याआधी 25-30 दिवस
    3. डाळिंब, चिकू, पेरू, लिंबू, सीताफळ, रामफळ, आंबा, संत्री, मोसंबी लागण करण्याआधी 25-30 दिवस
    #

    आमच्या सर्व उत्पादनाविषयी अधिक माहितीसाठी ...

    Get answers and advice from people you want it from.