#

Products Detail

मॅक्सिसॉल

घटक - फुलविक असिड ७५%, पालाश (K2O स्वरुपात) – १५%, ओलावा – १०%, एकूण – १००%

नैसर्गिक शेतीसाठी अत्यंत उपयुक्त, आम्ल तसेच अल्कली जमिनीत क्रियाशील. नैसर्गिक स्वरूपातील प्रभावी असा चिलेटिंग एजंट म्हणून रासायनिक खताबरोबर याचा उपयोग केल्यास त्यांचे जमिनीत स्थिरीकरण खूप कमी होते. त्यामुळे खतांची उपलब्धता वाढते. स्थिरीकरण झालेल्या पोषणद्रव्यांचे उपलब्ध स्वरुपात रुपांतर होते. क्रियाशील मूळ परिसरात द्रावणीय स्वरूपातील पोषण द्रव्यांची मात्रा वाढते. मूळ परिसरातील उपलब्ध पोषणद्रव्यांची मात्रा वाढल्याने पिकांची वाढ सशक्त होते. बियांचे अंकुरण चांगले होऊन मुळांची वाढ चांगली होते. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढतो. जमिनीची भौतिक, रासायनिक व जैविक अवस्था सुधारते.

मात्रा :

रासायनिक खते तसेच सूक्ष्म अन्नद्रव्य खते यांच्याबरोबर देताना १०० किलो खतासाठी ५०० ग्राम मॅक्सिसॉल वापरावे. ड्रिपमधून खाते देताना एकावेळी १०० ग्राम/एकर या मात्रेत वापरावे. चांगल्या परिणामासाठी ड्रिपची खते देताना नेहमी याचा उपयोग करा. पानावर फवारून देण्यासाठी १०० लिटर पाण्यासाठी २५ ग्राम मॅक्सिसॉल वापरावे.


#

आमच्या सर्व उत्पादनाविषयी अधिक माहितीसाठी ...

Get answers and advice from people you want it from.