#

Products Detail

मॅक्झिकॅल बी प्लस

सर्व पिकांसाठी उपयुक्त

घटक – नैसर्गिक प्रथिने .

मॅक्झिकॅल बी प्लस आता नवीन सुधारीत स्वरुपात एक अत्यंत सुरक्षित व बिनधोक सूक्ष्मअन्नद्रव्ययुक्त मिश्रण.

मॅक्झिकॅल बी प्लसच्या वापरामुळे फळातील साखर व गर वाढण्यास मदत होते.फळ-काढणी नंतरची गुणवत्ता व फळे दीर्घकाळ टिकण्याची क्षमता वाढते. काढणीनंतरची फळगळ कमी होते. फळांचा देठाशी असणारा भक्कमपणा द्राक्षातील घडकूज व फळगळ कमी होते. वनस्पतीत यांच्या उपस्थितीमुळे आर.एन.ए. निर्मिती वाढते. नायट्रेट आणि अमोनियम नत्रापासून सुरुवातीला अमिनो एसिडची निर्मिती होते. आणि त्यानंतर प्रथिनांमध्ये रुपांतर करण्यास मदत करते आणि प्रथिन निर्मिती वाढते. त्यामुळे रोग आणि किडींपासून वनस्पतीचे नैसर्गिक संरक्षण होते. मुळांच्या, खोडांच्या आणि फुटीच्या अग्रभागाच्या वाढीस चालना मिळते. वास्पतीमधील सायटोकायनीन निर्मितीत वाढ होते. फळांना एकसारखा आकार येतो. द्राक्षात शॉट बेरीचे प्रमाण कमी होते. फळा-फुलांच्या गुणवत्तेच्या व उत्पादकतेच्या दृष्टीने मॅक्झिकॅल बी प्लस महत्वाचे आहे. द्राक्षमणी तडकणे,डाळिंब तडकणे, आंब्यातील साका मिरची आणि टोमॅटोमधील कुज इ. विकृती मॅक्झिकॅल बी प्लसच्या उपयोगाने कमी होतात.

मात्रा :

फवारून देण्यासाठी – 1.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी.


#

आमच्या सर्व उत्पादनाविषयी अधिक माहितीसाठी ...

Get answers and advice from people you want it from.