#

Products Detail

मायक्रो-अल्कली

सर्व पिकांसाठी उपयुक्त

घटक – पानावाटे फवारून देण्यासाठी सूक्ष्मअन्नद्रव्य मिश्रखत.

(पाण्यात 100% द्रावणीय, अल्कली जमिनीतील पिकांना फवारून देण्यासाठी)

1. पिक कोणतेही असो, पिकाला आवश्यक असणारी पोषणद्रव्ये मुळांद्वारे जमिनीतून घेत असतात.

2. त्यासाठी ती अन्नद्रव्ये (नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, लोह, जस्त, मॅगेनीज इ.) जमिनीमध्ये पाण्यात द्रावणीय स्वरुपात असावी लागतात.

3. अशा द्रावणीय स्वरूपातील अन्नद्रव्यांचेच मुळांद्वारे शोषण होत असते.

4. जमिनीतील पोषणद्रव्यांची उपलब्धता ही जमिनीचा सामू व जमिनीतील चुनखडीचे प्रमाण यांच्याशी निगडीत असते..

5. चुनखडीयुक्त (मुक्त चुना) जमिनीत चुन्याची विद्राव्य क्रियाशीलता व अल्कली गुणधर्मामुळे जमिनीचा सामू 7.5 ते 8.5 च्या दरम्यान असतो. त्यामुळे पोषणद्रव्यांची उपलब्धता कमी राहते.

6. त्याशिवाय बऱ्याच पोषणद्रव्यांचे स्थिरीकरण (अविद्राव्य स्वरूप) होते.

7. ज्या जमिनीचा सामू 7.5 पेक्षा जास्त आहे किंवा ज्या जमिनीत चुनखडीचे प्रमाण 7.5 पेक्षा जास्त आहे.

8. अशा जमिनीतील पिकांमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांचे (झिंक, लोह, मॅगेनीज इ.) पाण्यात अविद्राव्य स्वरुपात रुपांतर होते. त्यामुळे त्यांचे पिकांच्या मुळांद्वारे शोषण होत नाही.

9. जी पोषणद्रव्ये पानांवर फवारून दिल्यास पिकांचे संतुलित होऊन पिकांची निरोगी वाढ होते.

10. अशा प्रकारच्या जमिनीतील पिकांना पानावर फवारण्यासाठी मायक्रो-अल्कली हे सूक्ष्मअन्नद्रव्य मिश्रखत उपयुक्त आहे.

मात्रा :

1) मात्रा : 1) फवारून देण्यासाठी – (1 ते 1.5 ग्रॅम प्रति लिटर.)


#

आमच्या सर्व उत्पादनाविषयी अधिक माहितीसाठी ...

Get answers and advice from people you want it from.